अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो. (उदाहरणार्थ खराब टायरमधून बाहेर येणाऱ्या आतल्या ट्युबच्या फुगवट्याप्रमाणे)
हर्निया म्हणजे आंत्रगळ किंवा आंत्रवृद्धि किंवा अंत्रनिःसरण. पोटातील कमजोर स्नायूंमुळे निर्माण झालेल्या पोकळीत आतडी ओढली जाते व त्यामुळे पोट फुगते किंवा छोटा-मोठ्या आकाराचा फुगवटा दिसायला लागतो आणि पोट दुखायला लागते. हर्निया पुरुषांसह स्त्रियांमध्येही तसेच कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला होऊ शकतो. हर्नियाची लक्षणे किरकोळ वाटली तरी ती कधीही आढळू शकतात. बालकांमध्ये आढळणारा डांग्या खोकला, सज्ञान व्यक्तींमध्ये असलेला दमा, धुम्रपानामुळे येणारा खोकला तसेच अतिजड वस्तू, वजन उचलल्यामुळे हर्निया होतो.
हर्नियापासून बचाव
अशक्तपणा जाणवणे, पोटात आग होणे, दुखणे तसेच खोकला काढल्यावर किंवा झोपल्यावर पोटातील जांघेतील फुगा न दिसणे किंवा काहीतरी जडान्न खाल्ल्यानंतर खोकला येणे व दुखणे ही हर्नियाची लक्षणे आहेत. त्यामुळे हर्नियापासून बचाव करायचा असेल तर, ताण पडेल, पोट दुखेल व अस्वस्थता वाढेल असे कोणतेही काम शरीरावर लादू नका. हर्नियाकडे दुर्लक्ष न करता त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार घ्या. उपचार न केल्यास हर्नियाचा आकार वाढतो व पुढे तो जिवाला धोकादायक बनू शकतो.
थ्री-डी मेश हर्निया रिपेअर शस्त्रक्रियेचे फायदे
- कमीतकमी टाके
- हर्नियापासून खात्रीशीर सुटका, पुन्हा हर्निय उद्भवत नाही
- अंशतः भूल देऊन शस्त्रक्रिया शक्य
- रुग्णाची हॉस्पिटलमधून २४ तासात सुटका, जलदगतीने बरे वाटते
- तीसऱ्या दिवसापासून दैनंदिन कामांना सुरवात करू शकतात
हिलिंग हँड्स क्लिनिक हे भारतातील एकमेव थ्री-डी हर्निया क्लिनिक आहे ज्याला अमेरिकेतली डॉ. जॉन मर्फी यांच्याकडून सेंटर ऑफ एक्सलन्सने प्रमाणित केले आहे.
– हर्नियावरील शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्राव व संसर्गाची शक्यता असते. मधुमेह, व्यसनी व्यक्ति तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा धोका अधिक असतो. परंतु डॉक्टर चांगला असल्यास रक्तस्त्राव अजिबात होत नाही तसेच संसर्गही अँटीबायोटिक्सच्या सावध वापराने टाळता येतो.
– शस्त्रक्रियेला फक्त २० मिनिटे लागतात व रुग्णाला फक्त सुई टोचल्यासारखा भास होतो. यापेक्षा अधिक त्रास होत नाही.
– हर्निया असलेल्या आवश्यक तेवढ्याच भागापुरती भूल दिली जाते. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन तासानंतर भुलीचा प्रभाव जातो.
– शस्त्रक्रियेनंतरच्या काही दिवसांमध्ये चालताना, जिना चढताना किंवा उतरताना त्रास होतो. हा त्रास गोळ्यांनी कमी होऊ शकतो तसेच काही
दिवसातच तो नाहीसा होतो.
– खूप ताप आल्यास, गोळ्यांनी दुखणे कमी न झाल्यास, रक्तस्त्राव होत राहिल्यास किंवा सतत उलटी करावी वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. अश्विन पोरवाल, कन्सलटंट प्रोक्टोसर्जन, हिलिंग हँड्स क्लिनिक
चौथा मजला, मिलेनियम स्टार एक्सटेन्शन,
रुबी हॉल क्लिनिकच्या जवळ,
ढोले पाटील रस्ता, पुणे.
अपॉइंटमेंटसाठी क्रमांक : ८८८८२८८८८४