मुळव्याधाचा त्रास होतोय असं म्हणणार्या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोनात एक असं याचं गुणोत्तर असून ही धोक्याची घंटा आहे. मुळातच आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर प्रत्येकालाच मुळव्याधीचा त्रास होतो. मुळव्याधीचा त्रास स्वत:बाबत असो वा कुटुंबातल्या अन्य कोणाबरोबर रक्त जाणे हा घटक तर कोणालाही घाबरवणाराच आहे. मुळव्याध बरा करणारा सोपा उपचार म्हणणार्या असंख्य पद्धती बाजारात आहेत. त्यातील काही पद्धतींमध्ये तर वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक सफाईदेखील नाही. त्यामुळे कोणती उपचार पद्धती स्विकारावी याबाबत साहजिकच रूग्णांचा गोंधळ उडतो. मुळव्याध आणि फिस्तुला बरं करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी सर्जरी तर वेदनादायक आहेच परंतु त्यातून रिकव्हर होण्यासाठीसुद्धा दीर्घकाळ लागतो.
सध्याच्या या प्रचलित चित्राचा विचार करून कोलोरेक्टल सर्जन आणि हिलींग हॅण्डस किल्निकचे डॉ. अश्विन पोरवाल यांनी मुळव्याध, फिस्तुला आणि इतर गुदाशय व मलमार्गाशीसंबंधीत आजारांवर उपचार करणारी पद्धती शोधली आहे. या पद्धतीत मुळव्याधीसाठी लिओनार्डो लेसर ट्रीटमेंट वापरी जाते. या पद्धतीने रूग्णाला तातडीने फरक पडतो आणि मुख्य म्हणजे आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यताही खूप कमी आहे. कुठल्याही कापाकापीशिवाय होणारी आणि वेदनाहीन असणारी उपचारपद्धती आहे. त्यामुळे रूग्ण पुढच्या ३ ते ५ दिवसांच्या आरामानंतर नियमित कामे करू शकतात. लिओनार्डो लेसर पद्धतीचा फायदा फिस्तुला झालेल्या रूग्णांनाही होतो. पिसोनियस सायनस हा आजार तर सहजासहजी बरा होत नाही मात्र याही आजाराबाबत लेसर ट्रीटमेंट काम करत असल्याचे दिसत आहे.
भारतातील प्रणेते आणि नामवंत प्रोक्टोलॅाजिस्ट डॉ. अश्विन पोरवाल यांनी आत्तापर्यंत मुळव्याधीचे हजारो रूग्णांना बरे केले आहे आणि फिस्तुल्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या केसमधील रुग्णांनाही यशस्वीरित्या बरे केले आहे. डॉ. पोरवाल म्हणाले, ‘शौचासाच्यावेळी रक्त जाणे ही निश्चितच भीतीदायक बाब आहे. त्यामुळेच आम्ही मुळव्याधीसाठी लेसर हिमोर्होडोप्लास्टी (एलएचपी) आणि फिस्तुलासाठी फिस्तुला ट्रॅक्ट लेसर क्लोजर या उपचारपद्धती शोधल्या आहेत. प्रोक्टोलॉजीतील या दोन्ही पद्धती अत्यंत आधुनिक असून माझ्या आजपर्यंतच्या अनुभवाचा विचार केला तर मुळव्याधीची नुकतीच सुरवात झालेल्या रूग्णांसाठी तर या उपचारपद्धती अत्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय आहेत. फिस्तुलाच्या संदर्भातही ही पद्धत उपकारक ठरली आहे. लिओनार्डो लेसरपद्धतीने आम्ही अगदी अवघड केसेसमध्ये यश मिळवलं आहे. ज्या केसमध्ये इतर उपचारांनी फरक पडला नाही अशाही केसमध्ये ही लेसरपद्धत काम करून गेली. आपल्या आजच्या धांदलघाईच्या जीवनशैलीत प्रत्येकालाच त्वरित आणि परिणामकारक उपचार हवे असतात. लेसरपद्धती नेमकं तेच काम करते.’